* इकोफ्रेंडली *
*राजा तेजुकायाचा*


कागत, मातीतून घडवू आकार....
पर्यावरणाचा करु विचार !!!

आग्रहाचे आमंत्रण

* आगमन सोहळा २०१९ *

 दि. २ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ठिक १०.०० वा. 

तेजुकाया पटांगण

 संपूर्ण 
ज्याच्या आगमनाने सर्वत्र नवचैत्न्य निर्माण होते व आनंदलाही भरती येते व जाण्याने विरहाचा सागर निर्माण होतो अशा या सार्वजनिक उत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांना आमच्या ट्रस्ट्चे विनम्र अभिवादन !!!


स्वातंत्र्य संग्रामाचे स्फ़ुल्लींग सर्वसामान्याच्या मनात पेटवून स्वातंत्र्याचे अग्नीकुंड धगधगते ठेवण्यासाठी देव्हाऱ्यात पूजल्या जाणाऱ्या “श्री गणेशाला” देव्हाऱ्यातून बाहेर काढून सार्वजनिक स्वरूप दिले.समाज प्रबोधन स्वातंत्र्य आत्मनिर्भर समाज़ निर्मिती हि प्रमुख उद्दिष्टे टिळकांना अभिप्रेत होती.पण त्या उद्दिष्ट्यांना हरताळ फ़ासून कोणी श्री गणेशाच्या उंचीचा ,कोणी अवाढव्यतेचा,कोणी नवसाचा तर कोणी जाहिरातींचा बाजार मांडून प्रमुख उद्दिष्ट्यांना मुठमाती दिली.

आज महाराष्ट्र व महाराष्ट्रातील भूमीपूत्रावर परप्रांयांचे मोठे ढग सतत गोंगावत असतात व पुणे मुंबई सारख्या शहरांवर त्यांच्या लाटा सतत आदळून फ़ूटून त्यातून झोपडट्ट्या व गुन्न्हेगारांचे अड्डे निर्माण होत असतात.सरकारी नोकऱ्या ते भाजी विक्रेते,मासळी विक्रेते अशा सर्वच क्षेत्रात परप्रांतीयांच्या घुसखोरीमुळे भुमीपूत्र नाडला जात आहे.टिळकांना केसरी वर्तमान पत्रातून इंग्रज सरकार वर अनेकदा पडखळ लेख व टिका करुन सरकारला कोंडीत पकडून नमते घ्यायला भाग पाडले ते जनरेट्यामुळे,पण आजची पत्रकारीका तेवढी ज्वलंत राहिलेली नाही.बऱ्याच अंशी विकावू पत्रकारिता आढळून येते तर जनता ढिम्म झालेली आहे.काही पत्रकार प्रामाणिक प्रयत्न करतात.पण लिहणारा लिहतो वाचणारा वाचतो पण काय वाचले हे काही समझत नाही,समजले तर काय करायचे हे उमजत नाही.ज्याला उमजले तो कृतीशुन्य असतो,त्याहूनही कोणी कृतीशील झाला तर विकला जातो व यातूनच परप्रांतीयांचे फ़ावते.

सरकारला तर भुमीपुत्रांबद्द्ल काय आस्था आहे हे सर्वश्रृत आहे.नाहितर आमच्या या मंगलमय सोहळ्यात मिरज सारख्या ठिकाणी दंगल घडवून संपूर्ण सोह्ळ्यावर भितीचे सावट निर्माण करण्याचे कोणी धाडस केले असते का ? धाडस केले त्याला आमच्यातील निष्क्रियता व सरकारचे लांगुलचालनाचे धोरणच जाबाबदार आहे.नाहितर महाराष्ट्रात एखादा परप्रांतीय गृहनिर्माण मंत्री होऊ शकला असता का ? पण परप्रांतीय व अल्पसंख्यांकाची व्होट बँक या साठीच हे सर्व आमच्यावर लादले जात आहे.

शिवरायांच्या मुठभर मावळ्यांनी यवनांच्या अफ़ाट सेनेला थोपऊन महाराष्ट्रभुमीचे रक्षण केले त्याच मावळ्यांचे वंशज म्हणून आम्हांला अभिमान वाटतो पण त्यांच्यातील एक अंश स्वाभिमान,शौर्य मात्र आम्च्या रक्तात दिसत नाही.नाहीतर भुमीपूत्रांना बेदखल करणाऱ्या सरकारला केव्हांच पायउतार व्हावे लागले असते.

आज आपल्या देशात सर्वमान्यता कशाला प्राप्त झाली तर भ्रष्टाचाराला म्हणुनच जगात भ्रष्टाचाराचे सुवर्ण पदक आम्हाला मिळते इतर कोणत्याही क्षेत्रात नाही.

संपूर्ण देशात महागाईचा भस्मासूर माजला आहे व त्यात सामान्य जनता होरपाळून निघत आहे.त्याबद्द्ल केंद्र व राज्य सरकार ढिम्मच आहे.आघाडीत बीघाड होण्या येवढे आरोप प्रत्यारोप करून महागाईची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत आहे.म्हणूनच श्री चरणी आमच्या मंडळाची प्रार्थना..!!

 

हे गजानना एकच प्रार्थना तुमच्या चरणी

भ्रष्ट राजकारण्यांच्या विळख्यातून मुक्त हूऊ दे भारत भूमी ।

एकच मागणॆ तुमच्या चरणी परप्रांतीयांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्रभूमी,

शक्ती,बुध्दी दान दे आम्हां सकळ भुमीपूत्र एकवटाचा महाराष्ट्र धर्म जागवावा…!!