” तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट “
तेजुकाया हे नाव उजाळा देते ते ब्रिटीश काळातील अत्यंत कर्तबगार बांधकाम व्यवस्थापकाचे, ज्यांचे नाव होते “राव बहादूर सेठ श्री तेजुकाया जे.पी.” ज्यांनी १८९० काळापासुन अत्यंत कौशल्याने आणि जबाबदारीने अनेक बांधकाम कार्ये पार पाडली होती
* नवसाचा गणपती *
सेठ तेजुकाया यांचे २ सुपुञ श्री. प्रमोदकुमार व कांतीलाल तेजुकाया हे तेजुकाया विभागाचा कार्यभार सांभाळत होते. दोन्ही भावांना कन्यारत्न होते पण पुञ होण्याचि इच्छा होती. पण १९८१ पर्यंत ती सफल झाली नाही. १९८१ च्या गणेश चतुर्थीला ट्रस्टच्या पदाधिका-यांनी, तेजुकायाच्या टेनंट मिळुन तेजुकायाच्या राजाकडे हे साकडे मांडले आणि एक नवस बोलला गेला तो सुपुञ होण्याचा. सर्वांनी एकमुखाने केलेल्या प्राथनेला प्रसन्न होऊन १९८२ च्या गणेश चतुर्थीलाच श्रीमती किशोरीबेन प्रमोदकुमार तेजुकाया यांना पुञरत्नाचा लाभ झाला. ज्याचे नाव पुढे प्रणव ठेवण्यात आले. अशा प्रकारे एकमुखाने आणि श्रध्देने केलेल्या नवसाला तेजुकायाचा राजा पावला. त्यानंतर सच्च्या आणि श्रध्देने केलेल्या प्राथनेला राजा पावतो अशी किर्ती सर्वकडे पसरली. आणि भक्तांचा आोघ वाढू लागला.
आजपर्यंत तेजुकायाच्या राजाने जागेचे मालक आणि टेनंट मधले नाते घट्ट तर केलेच पण अनेक तंट्टे, गैरसमज लगेचच दूर केले, त्यामुळे आनंदी वातावरण तर निर्माण झालेच पण लोकांची श्रध्दाही राजावर दृढ झाली. भक्तांचा आोघ वाढत होता, निधीही चांगला जमत होता, मग ह्या निधीचा सर्व थरातील लोकांना लाभ मिळावा अशी संकल्पना समोर आली आणि तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टची स्थापना झाली.